महाराष्ट्राचे ब्रँड व्हॅल्यू असणारे मा.पोटभरे साहेब यांच्या पाठिंब्याने मा.रमेशरावजी आडसकर यांच्या विजयावर शिकामोर्तब झाले- नितीन काळे.
माजलगाव मतदार संघात चूरशीच्या लढतीत रोज नवनवीन पक्ष प्रवेशच्या अनुषंगाने आज या उमेदवाराचे तर उद्या त्या उमेदवाराचे विजयाचे पारडे इकडे तिकडे झुकताना पहायला मिळत आहे.पण महाराष्ट्र राज्यात आणि बहुजन समाजाच्या गळ्यातील ताईत असणारे आणि ब्रँड व्हॅल्यू समजले जाणारे बहुजन विकास मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष मा. पोटभरे साहेब यांनी काल राखून ठेवलेला सस्पेन्स तोडला आणि अपक्ष उमेदवार मा. रमेशरावजी आडसकर यांना पाठिंबा जाहीर केल्याने आता त्यांच्या विजयावर शिक्का मोर्तब झाले आहे, आणि या वर्षी माजलगाव मतदार संघांचे आमदार मा. रमेशजी आडसकर हेच असतील असे मत बहुजन विकास मोर्चा चे सोशियल मीडिया प्रमुख नितिन काळे यांनी कॉर्नर बैठकीच्या वेळी व्यक्त केले.