22.8 C
New York
Monday, April 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

अनिल राधे कांबळे मित्र मंडाळाचा महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांना पाठिंबा.

अनिल राधे मित्र मंडळाचा महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांना पाठिंबा.

अनिल कांबळे यांनी भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले.

माजलगांव, सुनिल थोरात

माजलगाव येथील सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये अनिल राधे कांबळे मित्र मंडळाच्या वतीने मातंग समाज एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये अनिल कांबळे यांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांना जाहीर केलेला आहे. माजलगाव शहरांमध्ये रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिलेली आहे. विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी मातंग समाजाबरोबर भेदभाव केलेला आहे व मातंग समाजाला कसल्याही प्रकारचे सत्तेमध्ये स्थान दिलेलं नाही तसेच जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल या ठिकाणी मातंग समाजाला एकही जागा दिलेली नाही किंवा मातंग समाजाला समाज मंदिर असेल किंवा दलित वस्त्यावरील रस्ते असतील इतर विकास कामे केलेली नाहीत. त्यामुळे प्रकाश सोळंके यांच्यावर मातंग समाज नाराज आहे. या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मातंग समाज आपली ताकद दाखवून देईल असे यावेळी बोलताना अनिल कांबळे यांनी सांगितले. तसेच नितीन दादा नाईक नवरे या ठिकाणी उपस्थित होते व त्यांनी बोलताना सांगितले की अनिल राधे कांबळे आजच्या युवकांचे नेतृत्व करणारा तरुण तडफदार युवक असून येणाऱ्या काळात एक उभरता चेहरा असेल व समाजाला न्याय देण्याचं काम करेल.यावेळी माजी सभापती नितिन नाईकनवरे व मित्र मंडाळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या