10.5 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

आ.संदीप क्षीरसागरांच्या निष्ठेला न्याय बीड मतदारसंघासाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर

बीड दि.२६ (प्रतिनिधी):- विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून बीडच्या उमेदवारीच्या अनुषंगाने उलट-सुलट चर्चा रंगवल्या जात होत्या. तसेच बीड जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने विविध अफवा पसरवल्या जात होत्या. यावर आता पूर्ण विराम लागला असून राष्ट्रवादी-काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आ.संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यातून एकमेव आमदार असलेले संदीप क्षीरसागर शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. आ.क्षीरसागरांनख त्यांच्या भूमिकेपासून परावृत्त करण्यासाठी अनेक प्रलोभने देण्यात आले. अनेकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु कसल्याही दबाव आणि प्रलोभनांना न जुमानता आ.संदीप क्षीरसागर शेवटपर्यंत आपला पक्ष, नेते आणि विचारांसोबत राहीले. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर आ.क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील पक्षीय कामकाजाचे सूत्रे देखील सांभाळली होती. त्यांच्याकडे पक्षातील वरिष्ठांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बीड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी आ.संदीप क्षीरसागर यांना दिली आहे. आता संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. आ.संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीबाबत उलट-सुलट चर्चा असताना उमेदवारी शेवटी आ.क्षीरसागरांनाच मिळाल्याने एकनिष्ठेला न्याय मिळाला अशी भावना सामान्य लोक करत आहेत

 

विरोधाचे चक्रव्यूह अखेर भैय्यांनी तोडलेच!आ

.संदीप क्षीरसागरांना एकटे पाडून त्यांची उमेदवारी अडविण्यासाठी बीड जिल्ह्यापासून मुंबईपर्यंत अनेक प्रयत्न झाले. अनेकांनी त्यांचे संपूर्ण सामर्थ्य पणाला लावले पण शेवटी विजय विचार आणि एकनिष्ठतेचाच झाला. लोकप्रिय आणि जनसामान्यांशी थेट कनेक्ट असलेल्या युवा नेतृत्वाला पुन्हा संधी मिळाल्याने जनसामान्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

मी बीडचा, बीड माझे”- आ.संदीप क्षीरसागर

“मी बीडचा, बीड माझे” बीडकरांशी असलेले माझे नाते कधीही तुटू शकणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी घोषित झाली. मला उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.श्री.जयंतराव पाटील साहेब, खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह पक्षाचे सर्व नेते मंडळी यांचे आभार मानत असल्याच्या भावना आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या