मातोश्रीने_निष्ठावंत_शिवसैनिकांस_न्याय_दिला..युवा सेनेच्या_जिल्हाप्रमुखपदी_अभिषेक_दिवे_पाटील_यांचीनिवड जिल्हाभरातील_युवासैनिकात_नवचैतन्य_संचारले..
बीड(प्रतिनिधी):गेल्या अनेक महिन्यापासुन बीड जिल्ह्यातील युवासेनेची कार्यकारणी रिक्त होती.काल दैनिक सामना या मुखपत्रातुन बीड जिल्ह्यातील युवासेनेची कार्यकारणी जाहिर करण्यात आली.बीड युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी अभिषेक दिवे यांची निवड करण्यात आली युवासेनाप्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे साहेब व युवासेनेचे सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू निकटवर्तीय असल्याचे समजते या निवडीचे जिल्हाभरात कौतुक करण्यात येत आहे तसेच या निवडीमुळे जिल्हाभरातील युवासैनिकांत नवचैतन्य संचारले आहे.
युवासेनेच्या स्थापनेपासुन श्री.अभिषेक दिवे हे युवासेनेत निष्ठेने काम करत होते.शिक्षण, आरोग्य, रोजगार या युवासेनेच्या त्रिसुत्रीप्रमाणे त्यांची राजकीय वाटचाल राहिलेली आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या फीसवाढी विरोधात त्यांनी आंदोलने केलेले आहेत.विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मदत कक्ष उभारला होता.युवासेनेच्या आंदोलनात त्यांचा नेहमीच सहभाग असतो.अभिषेक दिवे हे शिवसेना,युवासेना व ठाकरे परिवाराशी कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना एकनिष्ठतेचे फळ म्हणुन मातोश्रीने युवासेना जिल्हाप्रमुख या पदाची माळ गळ्यात टाकली आहे.
श्री.अभिषेक दिवे या पदाला नक्कीच न्याय देतील असा विश्वास जनतेच्या मनात आहे.युवासेनेची बीड जिल्ह्यात मोठी बांधणी करुन युवासेनेचे जाळे ते विणतील व अनेक तरुणांना युवासेनेत दाखल करतील अशी चर्चा बीडमध्ये रंगताना दिसत आहे.येत्या स्थानिक संस्थाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावुन काम करणारी युवासैनिकांची फौज या निवडीमुळे बघायला मिळेल यात तिळमात्र शंका नाही.