7.1 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

पंकजाताई मुंडे यांनी दिला आत्महत्याग्रस्त तरूणांच्या कुटुंबाला धीर

🔸डिघोळ अंबा, येस्तार येथे सोनवणे, मुंडे परिवाराचे केले सांत्वन; कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभा राहणार

🔸स्वतःला संपवू नका, तुमच्या जीवातच माझा जीव आहे, निराशेतून बाहेर या

बीड महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज दुसर्‍या दिवशी डिघोळ अंबा आणि येस्तार येथे आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व धीर दिला. या तरूणांच्या परिवाराच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील, त्यांचा आधार होईल अशा शब्दांत त्यांनी परिवाराला धीर दिला. दरम्यान, स्वतःला संपवू नका, तुमचा जीव हा माझा जीव समजून त्याला जपा, या निराशेतून बाहेर या असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.

लोकसभेत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने डिघोळ अंबा ता. अंबाजोगाई येथील पांडूरंग सोनवणे आणि येस्तार ता. अहमदपूर येथील सचिन कोंडिबा मुंडे या तरुणांनी स्वतःचे जीवन संपवले. पंकजाताई मुंडे यांनी आज या दोन्ही गावात जावून सोनवणे व मुंडे परिवाराचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला. पंकजाताई पाहताच या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

स्वतःला संपवू नका ; तुमचा जीव हा माझा जीव

यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजाताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, आत्महत्येचं हे सत्र बंद झालं पाहिजे. माझ्या स्वतःसाठी ही चांगली गोष्ट नाही. मी हिमतीने लढणारी व्यक्ती आहे, मी कधी कोणत्या गोष्टीने डगमगले नाही पण ह्या प्रकाराने प्रचंड डगमगले आहे. लोकांनी स्वतःचे प्राण देणं हे मला अपराधी वाटतं. माझी विनंती आहे, असं काही करू नका. ह्या कुंटूंबाच्या मागे मी तर उभी राहणारच आहे, हा विषय सर्वांना सांगण्याचा नाही. पण आत्महत्या सारख्या गोष्टीचं मी समर्थन नाही करू शकत. आपल्या परिवाराला, लहान लेकरांना, पत्नीला वाऱ्यावर सोडून असा निर्णय कुणी घेऊ नये. तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर आपल्या कामातून, कष्टातून द्या परंतू प्रत्येकाचा जीव जाणं मला तेवढंच दुःखदायक आहे. तुमचा जीव म्हणजे माझाच जीव आहे असं समजून जपा, एवढीच माझी विनंती आहे. तुम्हाला शपथ आहे माझी या निराशेतून बाहेर या असं आवाहन त्यांनी केलं.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या