बीड महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : यशवंती आधार सामजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते श्री.राजेश बाबासाहेब दिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर झाडाची लागवड सिद्धबेट आळंदी या ठिकाणी करण्यात आली यावेळी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली यामध्ये चिंच,जांभळ,आंबा, आवळा, कारंजी,लिंब ,वड,पिंपळ बदाम इत्यादी झाडांची प्रामुख्याने लागवड करण्यात आली या वेळी प्रमुख पाहुणे वृक्षमित्र अरुण पवार साहेब, गायनाचार्य नारायण महाराज यमगर, विषुभाऊ कुऱ्हाडे,संतोष सुरवसे, डॉ. सुनील वाघमारे, विठ्ठल शिंदे, दिनेश कुऱ्हाडे,किशोर काळदाते, जनार्दन पितळे, बडगुजर साहेब, आदी मान्यवर उपस्थित होते.