23.1 C
New York
Friday, July 19, 2024

Buy now

spot_img
spot_img

परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित सन्मान कर्तुत्वाचा गौरव गुणवत्तेचा कार्यक्रम संपन्न.

🔸प्रा. नागेश जोंधळे यांचे 10 वी 12 वी नंतर करियर घडवण्याचा संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन

परळी महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा आयोजित सन्मान कर्तुत्वाचा गौरव गुणवत्तेचा हा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमात या उपक्रमाबद्दल बाळासाहेब जगतकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती ही देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने भीमनगर, साठेनगर, रमानगर व प्रबुद्ध नगर येथील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार व दहावी बारावी नंतर काय या विषयावर विशेष मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड.अनंतराव जगतकर तर प्रमुख उपस्थिती बीड येथील देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे तर आई सेंटरचे संचालक प्रा.नागेश जोंधळे व्याख्यान ,प्रमुख पाहुणे म्हणून परळी शहरातील नामवंत युवा उद्योजक व्ही.के.कलर होम चे संचालक,विनोद कांबळे तर विशेष निमंत्रित म्हणून मुंबई रेल्वे मेट्रोचे व्यवस्थापक राजू श्रावणराव जगतकर, गंगाखेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तथा राजश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. गुणवंत जगतकर विधीतज्ञ अँड.दिलीप उजगरे प्रा. विलास रोडे राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक आदर्श पुरस्कार करते परभणी लोहगावचे नरसिंह कॉलेजचे शिक्षक शेख सर नरसिंह कॉलेज लोहगावच्या डॉ.प्रा. यशश्री जगतकर औरंगाबाद हायकोर्टाच्या वकील अँड.ऐश्वर्या पवार / बनसोडे न्यूज महाराष्ट्र वन चे संपादक श्री खांडेकर आदी उपस्थित होत्या तर विशेष मार्गदर्शक म्हणून आई सेंटरचे संचालक प्रा. नागेश जोंधळे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं असून विद्यार्थ्यांनी काय करावं याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमात दहावी बारावी व विशेष प्राधान्य मिळवलेल्या व शेतकरी कुटुंबातील अनिशा विलास आदोडे हिने नीट परीक्षेत सातशे पैकी 582 गुण घेऊन तर अँड.संजय जगतकर यांच्या मुलीचा कॅनडा येथे मानसशास्त्र या विषया वर निवड झाल्याबद्दल हृदय सत्कार करण्यात आला असून यात एकूण 51 विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ समृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भीम नगर साठे नगर रमा नगर प्रबुद्ध नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजक बाळासाहेब जगतकर यांचे कौतुक करण्यात आले असून यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्रा. संघपाल समुद्रे, सोपानराव ताटे, अँड.संजय जगतकर, प्रा.बालाजी जगतकर, मिथुन रोडे,प्रा.महादेव हावळे, महादू रोडे, अशोक तरकसे, अशोक जगतकर, राज जगतकर, सिद्धार्थ जगतकर, उत्तम समुद्रे, संजय शिंदे, दशरथ जगतकर, राहुल जगतकर, रावसाहेब जगतकर, कपिल ताटे, चेतन ताटे, किरण कांबळे, रमेश तायडे,विशाल बनसोडे, मनोज कांबळे, रमेश जगतकर, धम्मा अवचारे, राम हावळे, समाधान भिसे, दौलत हनवते, सारनाथ जगतकर, बंडू इंगळे, विवेक बनसोडे, इत्यादी सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य आनंद तूपसमुद्रे यांनी प्रस्ताविक वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष प्रेम जगतकर यांनी तर आभार तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका डॉ.प्रा.यशस्वी जगतकर यांनी मानले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या