कोल्हापूर महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : राज्यातील कायम विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणारे महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष ‘संघर्ष योध्दा’ श्री. खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी भविष्यात सदैव राहू अशी ग्वाही माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांनी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष ‘संघर्ष योध्दा’ खंडेराव जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सपत्निक सत्कार सोहळा व शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना दिली.
गेल्या २५ वर्षांपासून विनाअनुदानित शाळा व शिक्षक यांच्या विविध मागण्यांसाठी अहोरात्र झटणारे ‘संघर्ष योध्दा’ खंडेराव जगदाळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे रविवार दिनांक 16 जून रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी विनाअनुदानित शाळांना अनुदानावर येण्यासाठी संघर्ष करणारा ‘संघर्ष योध्दा’ खंडेराव जगदाळे यांच्या कार्याचा भरभरून उल्लेख केला. जगदाळे यांच्या विविध आंदोलनामुळे विनाअनुदानित शाळेतील जवळपास साठ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन सुरू झाले आहेत. हे खऱ्या अर्थाने ‘संघर्ष योध्दा’ खंडेराव जगदाळे यांचे अनंत उपकार आहेत हे उपकार विसरता येणार नाहीत अशा शब्दात मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या सत्काराला उत्तर देताना ‘संघर्ष योध्दा’ खंडेराव जगदाळे यांनी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षक यांची व्यथा मांडल्या. या वेळी रिटायर होण्यापूर्वी तरी किमान आम्हाला १००% मिळावे, मेडिक्लेम योजना, जुनी पेन्शन लागू करावी, 15 मार्च 2024 संच मान्यता जाचक शासन निर्णय हा निर्णय रद्द झाला पाहीजे. सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करावे अशी मागणी या वेळी जगदाळे यांनी केली.
‘संघर्ष योध्दा’ खंडेराव जगदाळे सरांच्या सत्कारा नंतर त्यांच्याबद्दल बोलताना माजी गृहमंत्री सतेज पाटील उर्फ बंटी पाटील म्हणाले की,कायम विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणारे ‘संघर्ष योद्धा’ खंडेराव जगदाळे सर यांचे कार्य व संघर्ष खूप मोठा आहे. या पुढे प्रत्येक कार्यात मी सदैव त्यांच्या सोबत असेन आपले प्रश्न येणाऱ्या काळात निश्चित सोडविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी माजी गृहमंत्री सतेज पाटील यांनी दिली. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे दादा लाड, राहुल पोवार, आर वाय पाटील अनिल घाटगे, कृती समितीचे मराठवाडा विभागाचे कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे,
बीड जिल्हा कृती समितीचे मार्गदर्शक तथा बीड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण जगताप, बीड जिल्हा कृती समितीचे सुरेश कदम सर, बी बी बोराडे, सुनील पाटील,के बी पोवार, बी जी काटे, बाबा पाटील, मेजर के एम भोसले, प्रेमकुमार बिंदंगे, संदीप काळे, राजशेखर म्हामाणे, अमरसिंह खांडेकर, शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, सुरेखा शिंदे, नेहा भुसारी, गौतमी पाटील, जयश्री पाटील, भाग्यश्री राणे, मुक्ता मोटे, सरिता जगदाळे, यांच्यासह सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिह्यातील विविध संघटना पदाधिकारी व अंशतः अनुदानित शिक्षक उपस्थित होते.
चौकट – कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्यासाठी सदैव संघर्ष करणारे ‘संघर्ष योद्धा’ खंडेराव जगदाळे यांचा मराठवाडा विभागाच्या वतीने मराठवाडा विभागाचे कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे, महिला आघाडीच्या मुक्ता मोटे मॅडम, बीड जिल्हा कृती समितीचे मार्गदर्शक तथा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण जगताप, सुरेश कदम सर यांनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.