27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

➡️ बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या बदलीची अफवा; सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल

गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- बीड येथील जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबईहून डॉ.प्रवीण मुंडे येत असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या. परंतू या पोस्ट कोणी व्हायरल केल्या आणि त्यामागचा उद्देश काय? याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूका सुरू आहेत. बीडमध्येही १३ मे रोजी मतदान झाले. जिल्ह्यात प्रचार आणि मतदान प्रक्रिया शांततेत झाली. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि त्यांच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त केला. परंतू १५ मे रोजी दुपारपासून त्यांच्या बदलीच्या अफवा सुरू झाल्या. काही लोकांनी मुंबईचे झोन २ चे उपायुक्त डॉ.प्रवीण मुंडे यांचा फोटो टाकत बीडचे नवे एसपी, अशा पोस्ट व्हायरल केल्या.

याची खात्री करण्यासाठी सायं.दै महाराष्ट्र आरंभ चे गेवराई तालुका प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना संपर्क केला असता. यावर त्यांनी असे काहीही नसल्याचे सांगितले. ही अफवा पसरवली जात आहे. दरम्यान, सध्या आचारसंहिता चालू आहे. या काळात बदल्या करणे शक्य नसते. तसेच जिल्ह्यात अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे काही अनुचित प्रकारही घडला नाही. त्यामुळे अशाप्रकारची अचानक बदली होऊ शकत नाही.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या