गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान आज सुरू आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघासाठी आज सोमवार दि.१३ मे रोजी मतदान सुरू आहे. यात गेवराई तालुक्यातील माटेगाव केंद्रावरील एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि मतदारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माटेगाव केंद्रावर बंदोबस्तासाठी आलेला पोलीस कर्मचारी एक नंबर चे बटन दाबा असे मतदारांना म्हणत होता असे आरोप करत उपस्थित मतदारांनी बंदोबस्तासाठी असलेल्या त्या पोलीस कर्मचाऱ्याला तेथून हाकलून दिल्याचा प्रकार दुपारी घडला आहे. तसेच त्या पोलीस कर्मचाऱ्याने मतदारांशी अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला आहे.