27.6 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

सुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तन

सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी बहूसंख्येने उपस्थित रहा ग्रामस्थांचे आवाहन

गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- तालुक्यातील सुशी (व) येथील ३७ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (नारायणगडकर) यांच्या अमृततुल्य काल्याचे कीर्तनाने आज बुधवार दि.८ मे रोजी सांगता होणार आहे.तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ व समस्त भजनी मंडळ,सुशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संत कुलभूषण महात्मा सद्गुरू श्री नगदनारायण महाराज व भगवान गोरक्षनाथ महाराज व भगवान कुंभेश्वर यांच्या कृपाशीर्वादाने सुरु असलेल्या सुशी (व) येथील अखंड हरिनाम सप्ताहात सात दिवस महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मंडळींची सेवा झाली. सप्ताहामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. तर या सप्ताहाची

श्री क्षेत्र नगद नारायण महाराज संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.महंत गुरुवर्य प्रेममुर्ती शिवाजी महाराज यांच्या अमृततुल्य काल्याच्या किर्तनाने दुपारी ११ ते १ यावेळेत सांगता होणार आहे. व नंतर महाप्रसादाचे वाटप होईल तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पंचक्रोशी परिसर व सुशी समस्त ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या