25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

पाण्याच्या टाकीत लपून बसलेल्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

◼️गेवराई पोलिसांकडून गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश

गेवराई प्रतिनिधी (महाराष्ट्र आरंभ):- तालुक्यात मागील आठवड्यापासून चोरीच्या घटना घडत होत्या. टाॅवरच्या बॅटऱ्या तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे साहित्य अशा चोरीच्या घटना घडत होत्या. याची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच मोठ्या शिताफीने चोरी करणाऱ्या टिळीचा पर्दाफाश गेवराई पोलीसांनी केला आहे. तुम्हाला दारूसह जेवणाची पार्टी देतो, असे म्हणत दोघांना सोबत घेऊन, त्यांच्या मदतीने टाॅवर व वाहनांच्या बॅटऱ्या व साहित्याची चोरी ही टोळी करत होती. गेवराई पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यातील मुख्य आरोपीला पकडायला गेल्यावर आरोपी हा पाण्याच्या टाकीत लपून बसला होता. केवळ श्वास घेता येईल, एवढे तोंड त्याने वर केले होते. तसेच चोरी करायला जाताना बायकोलाही तो खोटा बोलल्याचे समोर आले आहे.

भीमा लक्ष्मण मस्के (वय ३७ रा.बलभीमनगर, बीड) मसू हनुमंत ताकतोडे (वय २२ रा.चांदणे वस्ती, पेठबीड) आणि सुरेश उद्धव चांदणे (वय ३४ रा.मांगवाडा, पेठबीड) अशी पकडलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. यातील भीम हा टोळीचा मुख्य म्होरक्या आहे. याच्यावर घरफोडी, चोरी, लुटमार आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहे.

आष्टी पोलीस ठाण्यातील कोठडीतूनही त्याने एकदा धूम ठोकली होती. पोलिसांनी कारवाई केल्यावर तो काही दिवस शांत होता. परंतु सध्या तो पुन्हा सक्रिय झाला होता. गेवराई तालुक्यात मागील आठवड्यापासून टॉवरच्या बॅटऱ्या तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे साहित्य चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याची माहिती गेवराई पोलिसांना मिळतात त्यांनी सापळा लावला असता, भीमा हा बीड मधील घरी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली घरात झडती घेतली परंतु तो मिळाला नाही. त्याचा मोबाईल, चप्पल असतानाही तो मिळत नसल्याने पोलिसांना संशय आला, अखेर पोलिसांनी टोपण लावलेली पाण्याची टाकी तपासली असतात, त्यात भीमा असल्याचे दिसले, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या इतर दोन साथीदारांनाही बेड्या ठोकल्या आहेत. हे तीनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या