23.1 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले पूर्ण! मुलगा बनला फौजदार

गेवराई तालुक्यातील राजपिंपरी तांड्याचा सुपुत्र भाऊसाहेब जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

◼️नवनाथ आडे | गेवराई

गेवराई तालुक्यातील राजपिंपरी तांड्याचे सुपुत्र भाऊसाहेब जाधव (ता.गेवराई जि.बीड ) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केल्याने त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. त्यांचे आई-वडील मोल मजुरी करतात. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश संपादन केले आहे.

भाऊसाहेब यांनी प्राथमिक शिक्षण मळशी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत घेऊन माध्यमिक शिक्षण देवपिंपरी येथे घेतले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बारावी विज्ञान शाखा, जयभवानी कॉलेज गढी येथे घेतले व पदवी शिक्षण शासकीय अभियांत्रिकी काॅलेज रायगड येथे घेवून हे यश मिळाले आहे.

भाऊसाहेब जाधव याला इंजीनियरिंग नंतर चांगला जॉब मिळाला होता परंतु आई-वडिलांची इच्छा होती की, माझा मुलगा मोठा साहेब व्हावा त्यामुळे त्याचं नाव पण भाऊसाहेब ठेवले होते. आई-वडिलांच्या इच्छेलाच भाऊसाहेब जाधव याचे स्वप्न बनले. मात्र स्पर्धा परीक्षेतील यश हे निश्चित असे कळले कठोर परिश्रम लोकनिंदा सहन करून पुढे जावे लागते. अनेक वेळा अपयश पचवून पुन्हा पेटून उठवून २०१६ च्या ऑक्टोंबर मध्ये एमपीएससी कष्टाचे ठरवून अवघ्या तीन महिन्यांत अभ्यास करून पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन परंतु ग्राऊंडच्या काही दिवस आधी मुतखड्याचे ऑपरेशन झाल्याने भाऊसाहेब जाधव यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ३० पेक्षा जास्त मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन पण भाऊसाहेब याला यश हाती येत नव्हते. त्यानंतर मधल्या काळात गावातील काही लोकांनी गावाकडील भांडणात तिथे नसतानाही भाऊसाहेब जाधव याचे नाव एका पोलिस केस मध्ये टाकले होते. अशा मोठमोठ्या संघर्षातून भाऊसाहेब जाधव यानी शेवटी स्वतःचे व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटीने अभ्यास करुन भाऊसाहेब जाधव यांनी परिस्थितीवर मात करून पीएसआय परीक्षेत यश मिळविले आहे. आई-वडिलांचे स्वप्नपूर्ती केल्याने कुटुंबासह गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शेतकऱ्याच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. त्याला कष्टाचे आयुष्य जीवनभर करावे लागते. हे कष्ट जाणून उच्च शिक्षित होऊन अधिकारी होणे ही खरंच अभिमानास्पद बाब आहे. हे भाऊसाहेब जाधव यांनी करून दाखवले आहे. तो गावातील पहिला पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. भाऊसाहेब जाधव हा मूळचा गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील राजपिंपरी तांडा येथील रहिवासी आहे.

ग्रामीण मातीतील आई-वडिलांचा संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न भाऊसाहेब जाधव यांनी बघितले. त्यासाठी त्यांनी शैक्षणिक वातावरणाच प्रभाव यामुळे जिद्दीने सलग सहा वर्षे अभ्यास केला. यामुळेच भाऊसाहेब जाधव यांच्या मेहनतीला फळ आले. भाऊसाहेब जाधव हा
गावातील पहिला पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. त्यामुळे गावातीलसह परिसरातील नागरिकांनी सत्कार करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या