उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु यांनी बजावल्या अनेकांना नोटीसा
गेवराई दि,१० (प्रतिनिधी):-सन उत्सव निमित्ताने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण यांचा परिणाम जेष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर महिला व रुग्णालयातील रुग्णांना मोठा त्रास होतो. क्षमतेपेक्षा जास्त आवाज कानावर पडल्याने अनेकांना आपल्या जिवानिशी जावे लागते. अशा घटना यापुर्वी लक्षात आल्या असून यांच्यावर पोलिस प्रशासनाचा अंकूश आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या मर्यादापेक्षा जास्त ध्वनीप्रदूषन करणाऱ्या डिजेवर थेट गून्हा दाखल करण्यात येईल. तसेच ती सामग्रीही जप्त करण्यात येईल अशी माहिती गेवराईचे उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु यांनी दिली आहे तसेच याबाबद अनेकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, मा सर्वोच न्यायालय यांच्या निर्देशानूसार तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम सन १९८६ सह ध्वनीप्रदूषण विनियमन व नियत्रंण नियमावली २००० चे अन्वये ध्वनिक्षेपक लाऊडस्पिकर, संगित, वाद्य व ईतर वाद्याचा वापर शासनाने विषेश वेळी एका कॅलेंडर वर्षात १५ दिवस रात्री २२:०० वा ते २४:०० दिलेली सवलत खेरीज करून इतर दिवशी दररोज संध्याकाळी ०६:०० ते २२:०० पवोतो येईल, तसेच या कायद्याअन्वे ध्वनिक्षेपक, लाऊडस्पिकर वाद्याचा वापर हा शांतता क्षेत्र वगळून ईतर ठिकाणी खालील नूमुद क्षेत्रानूसार मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात येऊ नये
खालील क्षेत्रानुसार डीसीबल मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात येऊ नये
( दिवसा ) ०६:०० ते २२:०० वाजता (अ) अद्योगिक क्षेत्र 75 डीबी ऐ एलईक्यू , ( ब ) व्यापारीक्षेत्र 65 डी बी ऐ एलईक्यू, ( क ) निवासीक्षेत्र 55 डी बी ऐ एलईक्यू, ( ड ) शांतताक्षेत्र 55 डी बी ऐ एलईक्यू, रात्री २२:०० ते २४:०० वाजता (अ ) 70 डी बी ए एलईक्यू ,( ब ) 55 डी बी ए एलईक्यू, ( क )45 डी बी ए एलईक्यू, ( ड ) 40 डी बी ए एलईक्यू , सदर सण उत्सवावा निमित्त वापरण्यात येेणाऱ्या ध्वनिक्षेपक, व लाऊडस्पिकर व इतर वाद्य कायद्याचे उल्लंघन करील व ठरऊन दिलेल्या डीसीबल मर्यादा ओलांडेल अशा व्यक्ती विरोधात तात्काळ गून्हा दाखल करण्यात येईल व ती सामग्री जप्त करण्यात येईल असे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी सांगून अशा सुचना देखील, गेवराई , तलवाडा, चकलांबा पोलीस ठाणे प्रमुखांना देण्यात आल्या असल्याचे उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांनी स्पष्ट केले आहे.