20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

मराठा आरक्षणासाठी तरूणाची गळफास लावून आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तरूणाची गळफास लावून आत्महत्या

गेवराई तालुक्यातील माटेगाव येथील घटना

 

गेवराई | नवनाथ आडे

 

मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटला असताना आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी गेवराई तालुक्यातील माटेगाव येथे २५ वर्षीय तरुणाने आज दि.०५ एप्रिल शुक्रवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आबासाहेब शिंदे (रा.माटेगाव ता.गेवराई जि.बीड) असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. आबासाहेब शिंदे याची गेवराई येथे वेल्डिंग व्यवसायाची दुकान आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आबासाहेब शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की, मी सुशिक्षित बेजार झालो असून मला आरक्षण नसल्यामुळे नौकरी मिळाली नाही. मी कर्जबाजारी आहे. जीवनात नैराश्य आले, मराठा आरक्षणासाठी बांधवांनी लढा दिला. त्यात सरकारने आम्हाला फसविले आहे. म्हणून मी आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहे. अशी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या सरकारने अजून किती बळी घेणार आहेत. आत्महत्याची माहिती मिळताच उमापूर चौकीचे विनोद सुरवसे, तुकाराम पवळ, अमोल येळे, घटनास्थळी धाव घेत स्पोर्ट पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या