27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय शरद पवार – पंकजाताई मुंडे यांचा लवाद घेणार

*ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय शरद पवार – पंकजाताई मुंडे यांचा लवाद घेणार*

*साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांच्या मांजरीतील बैठकीत झाला सर्वानुमते निर्णय*

पुणे ।दिनांक २७।
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीत दरवाढ करण्याचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचा लवाद घेणार आहे. साखर संघ व ऊसतोड कामगार संघटनांच्या आज झालेल्या बैठकीत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांची एक बैठक आज मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे झाली, ऊसतोड मजुरांच्या दरवाढीत आणि त्यांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यावर बैठकीत चर्चा झाली. कामगारांच्या मजूरीत २९ टक्के दरवाढ करण्याची तयारी साखर संघाने दाखवली आहे तर ही दरवाढ ४० टक्के असावी यावर ऊसतोड कामगार संघटना ठाम राहिल्या, त्यामुळे आज यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही.

*पवार- मुंडे घेणार दरवाढीचा निर्णय*
———–
ऊसतोड मजूरांच्या दरवाढीबाबत बैठकीत चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजाताई मुंडे यांच्या लवादाने घ्यावा यावर आजच्या साखर संघ व ऊसतोड मजूर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं, त्यामुळे येत्या ५ जानेवारीपर्यंत पवार-मुंडे लवादाची बैठक होऊन त्यात ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज झालेल्या बैठकीत साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील, उपाध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, प्रकाश आवाडे, ज्येष्ठ संचालक जयप्रकाश दांडेगावकर तर ऊसतोड कामगार संघटनांच्या वतीने आ. सुरेश धस, गोरक्ष रसाळ, श्रीमंत जायभाये, दत्तोबा भांगे, डी एल कराड, गहिनीनाथ थोरवे, सुखदेव सानप, सुरेश वनवे, जीवन राठोड आदी उपस्थित होते.
••••

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या