महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीला पाहता मराठा आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे यामध्ये सरकारला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डोकेदुखी होत वाढत आहे पण सरकारने मराठा बांधवांना आरक्षण देऊन तात्काळ प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी सर्व जाती धर्मातील लोकांकडून या ठिकाणी करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम आंदोलन करत आंतरवाले सराटी येथे पहिलं उपोषण केलं त्यानंतर अख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण तापत गेलं यामध्ये बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये अनेक जागी जाळपोह मोठमोठाले गुन्हे दाखल झाले मराठा समाजाला आरक्षण मिळावं हाच हेतू मनोज जरांगे पाटील यांचा आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आरक्षण द्या मराठा समाजाला आरक्षण देत असताना सरकार आज या ठिकाणी मराठा बांधवांना नाहक त्रास देत आहे या ठिकाणी लोक शेतकरी ऊसतोड मजूर हे ग्रामीण भागातून बीडला सभेला येण्यासाठी धावपळीमध्ये येत आहेत याचाच भाग ओळखून मेडिकेअर हार्ट हॉस्पिटल ने सर्व आलेल्या आंदोलनात स्थळी जनतेला सेवा म्हणून आरोग्य शिबिर व आरोग्य सेवा मोफत ठेवली आहे यावेळी मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनाला एक आगळे वेगळ्या पद्धतीने आरोग्य सेवा करून जनतेला मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी या ठिकाणी संबंधित हॉस्पिटलचे पथक बसून होते यावेळी अनेक पेशंटला तपासण्यात आले.
मा .मनोज जरांगे पाटील ऐतिहासिक सभा बीड गरजवंत मराठ्यांचा लढा निर्णायक इशारा सभा निमित्त येणाऱ्या सर्व मराठा बांधवासाठी मेडिकेअर हार्ट केअर हॉस्पिटल बीड यांच्या तर्फे मोफत वैद्यकीय सेवा मराठा बांधवासाठी दिली डाॅ. सुनिल एस. बोबडे, डाॅ.राधाकिसन एल.डाके व सर्व टीम अक्षय भैय्या जोगदंड..