28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

माजी जि.प.सदस्य व आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे निधन, आज अंत्यसंस्कार

माजी जि.प.सदस्य व आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे निधन, आज अंत्यसंस्कार

 

परळी प्रतिनिधी. बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या भिमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विजयकुमार गंडले हे घाटनांदूर ग्रामपंचायत उपसरपंच होते.तसेच बीड जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.भारतीय दलित पॅंथरच्या सामाजिक चळवळीत व मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला होता. फुले शाहू आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. अशा या लढवय्या नेत्याचं शुक्रवार दि. 22 रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दि. 23, रोजी सकाळी 11 वाजता भिमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.विजयकुमार गंडले हे प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत अजय कुमार गंडले यांचे ज्येष्ठ बंधू होते.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, तीन बहिणी, आप्तेष्ट असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीत सर्वत्र शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या