23.1 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

सहाव्या एकता मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन* -ग्रंथदिंडी,राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा,परिसंवादाने आणली रंगत-

सहाव्या एकता मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन* -ग्रंथदिंडी,राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा,परिसंवादाने आणली रंगत-

शिरूरकासार:-(प्रशांत बाफना)

एकता फाउंडेशन आणि गोमळवाडा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तालुक्यातील गोमळवाडा येथील एकता मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ.भास्कर बडे यांच्यासह माजी संमेलनाध्यक्ष दिनकर जोशी,श्रीराम संस्थानचे महंत भानुदास महाराज शास्त्री समाजकल्याणचे सहआयुक्त रविंद्र शिंदे,डॉ.विश्वास कंधारे,प्रभाकर सानप,जमीर शेख,राजकुमार पालवे,नारायण मुरूमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सकाळी वै.भागवत महाराज साहित्य नगरी मधुन ग्रंथदिंडीला सुरुवात झाली.या दिंडीत महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते.संमेलन स्थळासह प्रत्येक घरासमोर सडा टाकून रांगोळी काढण्यात आल्या होत्या.गावात सणासारखे वातावरण तयार झाले होते.गावातील प्रत्येकजण ग्रंथदिंडी मध्ये सहभागी होऊन आनंद घेत होता.गावातील प्रत्येक रस्त्यावर ग्रंथदिंडीचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात येत होते.ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर मान्यवरांचा स्वागत सोहळा पार पडला.या वेळी नायब तहसीलदार बाळासाहेब खेडकर,तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके,पोलिस उपनिरीक्षक औदुंबर मस्के,राजकुमार पालवे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत कराड यांनी केले.त्यानंतर स्वागताध्यक्ष आजिनाथ गवळी यांनी आपल्या भाषणात सर्वांचे स्वागत केले.शेवटी आभारप्रदर्शन पत्रकार गोकुळ पवार यांनी केले.

चौकट

*राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा* एकता फाउंडेशनच्या वतीने साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना विवीध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या मध्ये आदर्श पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिलीप खिस्ती,आदर्श शिक्षक पुरस्कार नजमा शेख, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मनिषा पवार आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार प्रभाकर सानप यांना देण्यात आला.त्यानंतर उत्कृष्ट कथासंग्रह वर्षा किडे-कुलकर्णी,उत्कृष्ट काव्यसंग्रह मनिषा पाटील-हरोलीकर,उत्कृष्ट कादंबरी ज्ञानेश्वर जाधवर,उत्कृष्ट बालसाहित्य जी.जी.कांबळे,उत्कृष्ट संकीर्ण किसन माने यांना पुरस्कार देण्यात आले. चौकट

*ग्रंथदिंडीने वेधले लक्ष*

साहित्यनगरी मधुन निघालेल्या ग्रंथदिंडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते.ग्रंथदिंडी मध्ये शिवाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,सुभाषचंद्र बोस यांच्यासह विवीध महापुरुषांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या