27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

दुर्दैवी घटना! धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

दुर्दैवी घटना! धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

————————

 

गेवराई | प्रतिनिधी

 

जालना जिल्ह्यात एक भीषण अपघाताची बातमी समोर येत असून, ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे धुळे-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. पुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून आलेल्या भरधाव कारने धडक दिली. ज्यात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुषांसह एका 10 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

 

अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील धुळे-सोलापूर महामार्गावर कारने रस्त्यावर उभा असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात काही वेळापूर्वी घडला आहे. दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. तसेच, कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, अपघातात मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या