25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रवादीचं कार्यालय अजित पवार गटाला दिलं.अध्यक्षाच्या निर्णयानं नवा वाद पेटणार? हिवाळी अधिवेशनात

राष्ट्रवादीचा कार्यालय अजित पवार गटाला दिले अध्यक्षांच्या नव्या निर्णयाने वाद भेटणार हिवाळी अधिवेशन तापणार.

 

नागपूर — राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवार दि.७ डिसेंबरला उपराजधानी नागपूर येथे सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्यभरातून १०० हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. मराठा आरक्षण, अवकाळी पावसाने झालेलं शेतीचं नुकसान यावरून यंदाचं अधिवेशन चांगलच गाजण्याची चिन्हे आहेत.

 

अधिवेशनात गदारोळ होण्याची चिन्हे असतानाच आता अधिवेशनापूर्वीच वादंग निर्माण झालं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय अजित पवार यांच्या गटाला देण्याची निर्णय घेतला आहे. यावरून चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे.

 

 

अधिवेशन काळात विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय आम्हाला देण्यात यावं, अशी मागणी काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्राद्वारे केली होती. विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य करत सदर कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या कार्यालयावर अजित पवार गटाचे नेते आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटीही लावण्यात आलीआहे. दरम्यान यावर शरद पवार गटाची प्रतिक्रिया आलेली नाही.

 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ९ ते २० डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. या कालावधीत १० दिवसांचे कामकाज चालेल. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६० हजार कोटींहून अधिक किंमतीच्या पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. त्यावर ११ व १२ डिसेंबरला चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलनावर चर्चा होणार आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या