20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

पंधरा दिवसात भगदाड पडलं आमदार लक्ष्मण पवार विकासाच्या नावाखाली गप्पा मारणं बंद करा त्वरिता देवी गडावरील एक कोटीचा निकृष्ट कामाचं पितळ उघडं बाळराजे कन्स्ट्रक्शनचे इंजिनिअर कुलकर्णी फोन उचलत नाहीत लक्ष्मण अण्णा रस्ता बघता का रस्ता बघता का.

त्वरिता देवी गडावरील एक कोटीचा निकृष्ट कामाचं पितळ उघड

* काम होऊन पंधरा दिवसातच रस्त्याला भगदाड पडू लागलं

* बोगस रस्ता बाळराजे कंट्रक्शन तयार केला होता.

* कुलकर्णी इंजिनीयर फोनही उचलेना, आमदार साहेब रस्ता पाहता का.

 

सुमेध करडे प्रतिनिधी- तलवाडा गेवराई तालुक्यातील जागृत देवस्थान माता त्वरिता देवी तलवाडा देवस्थानाच्या गडावर एक कोटीचं काम शासनाकडून मंजूर करण्यात आले होते तसं कामालाही सुरुवात झाली सुरुवातीपासूनच पेवर ब्लॉक गट्टू तसेच 217 मीटरचा सिमेंट रस्ता हे दोनच काम एक कोटीचे मंजूर झाले होते या कामाचं पितळ उघड पडलं असून पंधरा दिवसातच रस्त्याला तडे जाऊ लागले आहेत. देवस्थानाच्या ठिकाणीच असं काम केल्यामुळे वीस ते पंचवीस लाखातच सगळं काम आवरल्यामुळे भाविक भक्तातून नाराजीचा सूर तर निघतच आहे. आता हे काम पाहून संबंधित विभाग काय कारवाई करते. संतप्त भाविक भक्तासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठिकाणी त्वरिता देवीचे डोंगरावरती भव्य दिव्य मंदिर आहे देवीच्या दर्शनासाठी राज्यातून भाविक भक्त दर्शनासाठी देवी गडावर दाखल होतात या ठिकाणी गावातील परिसरासह राज्यभरातून भाविक भक्तांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच ठिकाणी गरज नसताना 217 मीटरचा रस्ता आडवा नऊ मीटर तसेच गट्टू मंगल कार्यालय समोर निकृष्ट दर्जाचे बसून एक लेवल ही न करता थातूरमातूर कामे करून पैसे काढण्यासाठी हात साफ करून घेतला सिमेंट रस्ता तर पूर्णच निकृष्ट दर्जाचा करून सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ सर्वात अगोदर हि बातमी र्र्प्र्र्प्मी प्रसिद्ध करून अशा कामाचं पितळ उघड केलं होतं. कामाला महिनाही उलटत नाही रस्त्याच्या बाजूला हलक्या दर्जाचे वापरण्यात आलेले सिमेंट खडी पंधरा दिवसातच तडे मारू लागली आहे एवढेच नाही तर रस्त्याच्या मध्यभागातही तडे जाऊ लागले आहे असे निकृष्ट दर्जाचे काम बाळराजे कंट्रक्शन या ठेकेदाराने केले असून अशा कामाबद्दल संतप्त भाविक भक्तातून नाराजीचा सूर निघत आहे.

हे काम कोणीही पाहिल्यास एक कोटीचं काम कोणीच नाही म्हणत.सदरील काम हे वीस ते पंचवीस लाखापर्यंत असू शकते यामुळे देवस्थानाच्या ठिकाणीच असे काम होत असून यामध्ये कार्यकर्ता तसेच ठेकेदार  गुतेदार पोसले असल्याचे बोलले जात आहे .  सदरील काम पाहण्यासाठी गेवराई तालुक्याचे आमदार लक्ष्मण आण्णा पवार काही दिवसापूर्वी काम पाहण्यासाठी त्वरिता देवी गडावर आले होते तालुक्यात त्यांची कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख आहे बाळराजे कन्ट्रक्शन या ठेकेदाराने असे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे आमदार लक्ष्मण पवार हे काय भूमिका घेतात? हे महत्त्वाचे आहे तर आमदार लक्ष्मण अण्णा रस्ता बघता का रस्ता बघता का अशी चर्चा भाविक भक्तांत व गेवराई मतदार संघात चालू आहे.    रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे उघड झालेच आहे परंतु पंधरा दिवसातच पितळ उघडे झाल्यामुळे एक तर चांगले झाले आहे.त्याच ठिकाणी उतार काढल्यामुळे संरक्षण भीत त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनधारकाचा ताबा जर सुटला असता तर मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते.

भाविकांची मोठी समस्या एप्रिल ते मे दरम्यान एक महिना यात्रा भरते त्या ठिकाणी भक्त निवास कंदुरी साठी होणारे कार्यक्रम व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची ही व्यवस्था नाही .एक कोटी रुपयात ही समस्या दूर झाली असती गरज नसताना हेच काम का केली.नाराजीचा सूर निघत असून कुलकर्णी नामक इंजिनिअरशी संपर्क केला असता चार ते पाच दिवसापासून फोनही उचलत नाहीत. बाळराजे कन्स्ट्रक्शनला आमदार लक्ष्मण पवार विचारणा करतील का अशी चर्चा गेवराई मतदार संघात चालू आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या