29.1 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

आज पंकजाताईची शिवशक्ती परिक्रमा यात्रा बीड मध्ये..! स्वागताला सज्ज कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे – राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे यांचे आव्हान

आज पंकजाताईंची शिवशक्ती परिक्रमा यात्रा बीड मध्ये..!

स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी बहुसंखेने सहभागी व्हावे – राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे

( बीड प्रतिनिधी

भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज सायंकाळी 05.00 वा. बीड शहारात दाखल होत आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभूतपूर्व स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात बहुचर्चित शिवशक्ती परिक्रमा यात्रा स्वभूमीत येत असल्याने भव्य स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने आपल्या लाडक्या नेतृत्वाचे स्वागत करण्यासाठी बहु संखेने सहभागी व्हावे. असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरचिटणीस सर्जेराव तांदळे, विक्रांत हजारी, प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहागीर,शांतीनाथ डोरले, चंद्रकांत फड, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, सुनील मिसाळ, गणेश पुजारी यांनी केले आहे.

शिवशक्ती परिक्रमा यात्रा महाराष्ट्रात परिक्रमा करून शनिवार दि. 09 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यात येत आहे. सायंकाळी 05.00 वा. बीड शहरात आगमन होत आहे. स्वागतासाठी भव्य मोटार सायकल रॅली आयोजित केली असून, नगदनारायण चौक चऱ्हाटा फाटा- बालेपीर – नगर नाका – छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे व्यासपीठ उभारले आहे. सायंकाळी 06.00 वा. ताईंचे भव्य स्वागत करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते यांनी स्वागतासाठी मोटारसायकल सह चऱ्हाटा फाटा येथे 04.30 वा. मोठ्या संखेने उपस्थित राहावे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या