20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

खटावकरांचा सामाजिक उपक्रम;दोन वर्षांच्या चिमुकलीचा वाढदिवस दिव्याग विद्यार्थी सोबत साजरा.


खटावकरांचा सामाजिक उपक्रम ;

दोन वर्षाच्या चिमुकलीचा वाढदिवस दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा

——————–

अनावश्यक खर्चाला फाटा; दिव्यांग विद्यार्थांना शैक्षणिक साहित्यासह फळ वाटप

——————–

गेवराई :

शहरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल खटावकर यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत आपल्या दोन वर्षाच्या कु.श्रीशा या चिमुकलीचा दुसरा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत शहरातील मुकबधीर व मतिमंद निवासी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक साहित्यासह फळ व मिठाई वाटप करुन सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. यावेळी मित्र परिवार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या आदर्श उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

गेवराई शहरातील कै.भगवानराव ढोबळे मुकबधीर व मतिमंद निवासी विद्यालयात अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक कार्यकर्ते विशाल खटावकर यांनी कन्या कु. श्रीशा ह्या चिमुकलीचा वाढदिवस आदर्श सामाजिक उपक्रमातून साजरा केला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना वहि, पेन, या शैक्षणिक साहित्यासह फळ व मिठाई वाटप केली. यावेळी दिव्यांग संघर्ष समितीच्या अध्यक्षा सुनिता भुते, विशाल खटावकर, मणिषा भागवत, मोहीनी खटावकर, उत्कृषा होंडे यांच्या सह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांना आभारपत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या