7.1 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे श्रावण सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

*श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे श्रावण सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम*

—————–

*श्रीकुंभेश्वर यात्रा महोत्सवास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा – महंत दत्ता महाराज गिरी*

—————–

गेवराई : 

     सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव ता. गेवराई येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने दि.४ सप्टेंबर रोजी श्री कुंभेश्वर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत गुरुवर्य दत्ता महाराज गिरी यांनी केले आहे. 

 

      गेवराई तालुक्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे महंत दत्ता महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते दरम्यान तिसऱ्या श्रावणी सोमवारी श्री. कुंभेश्वर यात्रा महोत्सव निमित्ताने पंचक्रोशीतील संपूर्ण बंजारा समाजातर्फे श्री.कुंभेश्वरास गंगोदकाचा जलाभिषेक दि.४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता होईल. नंतर परंपरेप्रमाणे पंचक्रोशीतील बंजारा समाज बांधवांच्या वतीने बंजारा समाज यांच्या वतीने भजन होईल. यानंतर सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प.मदन महाराज जिंतुरकर, लक्ष्मण महाराज पवार व बळीराम महाराज राठोड यांचे बंजारा भाषेत हरीकिर्तन यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. शिवाजी महाराज माने महांडूळा यांचे तिसऱ्या सोमवार निमित्ताने दुपारी १२ ते २ यावेळेत कीर्तन होणार आहे. यानंतर बंजारा समाज बांधव व भक्तगण मंडळी यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप होणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक पंचक्रोशी परिसर श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या