हिवरा बु. येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
हिवरा बु. प्रतिनिधी
माजलगावं तालुक्यातील हिवरा बु. येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली व जयंतीनिमित्त आयोजक लहुजी मित्र मंडळ हिवरा बु. यांच्या वतीने जि. प. प्रा. शाळा व गणेश विद्यालय हिवरा बु. येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या वेळी उपस्थित दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक बालासाहेब सोनवणे सर, व ओमप्रकाश आगे सर, तसेच शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी तसेच गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.