23.1 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फुले,शाहू, आंबेडकर अण्णा भाऊ याचे विचार तळागळात पोहचवण्याचे काम डॉ मिलिंद आवाड यांनी केले.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ यांचे विचार तळागळात पोहोचण्याची काम डॉ. मिलिंद आवाड यांनी केले

 

तलवाडा प्रतिनिधी: – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळापर्यंत शिव, शाहू, फुले, आंबेडकर अण्णाभाऊ यांचे विचार जयंतीच्या माध्यमातून पोहोचण्याचे काम मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष तथा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद आवाड (नाना) यांनी केले. हे काम करत असताना १ ऑगस्ट पासून ३१ ऑगस्ट पर्यंत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेकडो गावांमध्ये जाऊन प्रा. डॉ. मिलिंद आवाड यांनी केले. त्यांना हजारो फोन येत होते की आमच्या गावाला या अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. समाजाला आपली गरज आहे. आपण आमच्या गावाला एकदा भेट द्या असे फोन त्यांना येत होते परंतु त्यांना सर्व गावांमध्ये जाणे शक्य झाले नाही कारण एका एका दिवशी अनेक जयंतीचे कार्यक्रम असायचे मग त्यापैकी एक किंवा दोनच कार्यक्रम करणे शक्य असायचे वेळेचे अभावी असे कित्येक गावे आहेत तिथे प्रा. डॉ. मिलिंद आवाड यांना जाणे शक्य झाले नाही. ज्या ज्या गावात गेले त्या त्या गावात शिव, शाहु, फुले, आंबेडकर, आणि अण्णाभाऊ यांचे विचार तळागाळात पोहोचण्याचे काम प्रा. डॉ. मिलिंद आवाड यांनी केले. कर्मवीर ॲड. एकनाथ आवाड साहेब यांच्यानंतर प्रा. डॉ मिलिंद आवाड यांनी संघटनेची जिम्मेदारी घेऊन महाराष्ट्रभर दलित वंचित घटकाला न्याय देण्याचे काम करत आहेत. समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची गरज आहे असे सांगितले. आपला समाज हा आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये मजबूत झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. मिलिंद आवाड हे राष्ट्रीय पातळीवर दलित बहुजनांचे नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ नाव आहे. राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर त्यांचे काम आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच समाजाला पुढे नेण्याचे काम हे करू शकतात त्यांच्यात ती क्षमता आहे. जिथे प्रा. डॉ. मिलिंद आवाड यांना झालं नाही तिथ मानवी हक्क अभियानाच्या शिलेदार विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने गावागावात जाऊन प्रबोधन करायचे काम केले आहे त्यामध्ये राजेश घोडे, मच्छिंद्र गवाले, पप्पूराज शेळके, रघुनाथ कसबे, भारत बळवंते यांनी केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या