25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

अपयशाने खचलो नाही अन सत्तेमुळे हुरळून गेलो नाही – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर रोहित क्षिरसागर यांची इंन्ट्री युवा तरूण आकर्षित होणार

अपयशाने खचलो नाही अन सत्तेमुळे हुरळून गेलो नाही-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

 

बीड ते सूत गिरणी प्रवासात तीनशे गाड्याचा ताफा;ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

 

 

बीड- गेली चाळीस वर्षे आपण सक्रिय राजकारणामध्ये आहोत, स्व.काकूंनी दिलेला प्रत्येक धडा आजही गिरवत आहोत. विकास आणि समाजकारण या माध्यमातूनच जनतेशी जोडल्या गेले आहोत. सध्याची राजकीय परिस्थिती फार विचित्र आहे. धुराळा आणि फुफुटा प्रचंड उडालाय. त्याला शांत होवू द्या, नंतर निर्णय घेवू, राजकारणामध्ये संयम महत्वाचा असतो,मी अपयशाने कधीच खचलो नाही आणि सत्तेने हुरळून गेलो नाही,काळजी करू नका मी खंबीरपणे उभा आहे असे म्हणत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांंना आश्वस्त केले.

 

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या चार संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते. ईट येतील सूत गिरणीवर आयोजित सर्वसाधारण सभेला सभेचे स्वरूप प्राप्त झाले.सहा ते सात हजार निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आपण स्व.काकूंनी दाखवलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच वाटचाल करत राहिलो. राजकारणामध्ये अनेक यश-अपयश आपण पचवले आहेत. यशाने कधी हुरळून गेलो नाहीत आणि अपयशाने कधी खचूनही गेलो नाहीत. काळजी करून नका मी खंबीरपणे उभा आहे. आपण आपलं कर्तव्य पार पाडत राहायचं.सत्तेच्या माध्यमातून बीड शहर आणि बीड मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याचा आपण प्रयत्न केला. मग रूग्णालय असो की रस्ते असो की सिंचनाची कामे असो.प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्याचे काम आपण केले आहे. राजकारणामध्ये संयम महत्वाचा असतो आणि यश मिळवण्यासाठी जनतेचा विश्वास आवश्यक असतो. यापुढे सर्व निवडणुका आपण मोठ्या ताकदीने लढवणार आहोत. सध्या धुराळा आणि फुफुटा प्रचंड प्रमाणात उठला आहे. हा राजकीय धुराळा स्थिर होवू द्या त्यानंतर आपण निर्णय घेवू,कुटुंब प्रमुख म्हणून दोन्ही भावाच्या मुलांना राजकारणात सक्रिय केलं पण प्रवाहाच्या दिशेने त्यांनी वाटा निवडल्या हा त्यांचा निर्णय आहे,पण रक्ताच्या नात्यापेक्षा तुमचं माझ नात घट्ट आहे,साथ द्या मी शक्ती देतो,बीड जिल्हा क्रांतिकारक व अत्यंत प्रभावशाली विचारांचा आचारांचा व लोकांचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला जेव्हा गरज भासली तेव्हा तेव्हा बीड जिल्ह्याने नेतृत्व उभे केले आहे संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या काकूंनी अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा हातात घेतली होती संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रस्थापित लोकांनी विरोध केल्यानंतरही त्यांनी खासदार म्हणून एक हाती निवडणूक जिंकली होती त्यांच्या त्या राजकीय नेतृत्वाचा वसा व वारसा पुढे त्याच ताकदीने जिवंत ठेवण्याचे काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी केले आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी जो निर्णय घेईल तो तुमच्या हिताचा असेल आज माझ्याबरोबर या काळात जो उभा राहील त्याच्यासाठीच माझ्या उद्याच्या चांगल्या काळात सुगीचे दिवस असतील याची खात्री बाळगा कोणताही देव एका नवसाने पावत नाही अथवा कोणते नेतृत्व एखाद्या पराभवाने संपत नाही अशावेळी घाई करून चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा निर्णय घेण्यासाठी योग्य वेळेची व संधीची वाट पाहण्यातच खऱ्या नेतृत्वाचे कौशल्य आहे त्यामुळे आपण सर्वांच्या सहमतीने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ व पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या राजकारणात गरुड झेप काय असते हे सगळ्यांना दाखवून देऊ त्याची साक्ष देण्यासाठी आपण ज्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात हीच गोष्ट माझ्यासाठी व आपल्या राजकारणासाठी धैर्य वाढवणारी आहे अनेक वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्या इतके चढ-उतार यश व अपयश अन्य कोणीही पाहिले नाही मी कधीही यशाने हुरळून गेलो नाही आणि अपयशाने खचलो नाही, त्यामुळे कोणी चुकीचे निर्णय घेऊन आपल्याला बदनाम करीत असेल तर अशा लोकांनाही आपण माफ करणार नाही,हीच या दिवशीची भूमिका असेल असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक विलास विधाते यांनी केले तर यावेळी रोहित क्षीरसागर, गंगाधर घुमरे सुधाकर मिसाळ,मुखींद लाला यांचीही भाषणे झाली.

यावेळी ह भ प नाना महाराज बेदरकर,जगदीश काळे,रोहित क्षीरसागर,हर्षद क्षीरसागर,दिनकर कदम,विलास बडगे, नानासाहेब काकडे,गणपत डोईफोडे,अरुण डाके,गंगाधर घुमरे,तानाजी कदम,अरुण बोंगाणे,शिवाजीराव जाधव, बाबुशेठ लोढा,नितीन लोढा, मुखीद लाला,किशोर पिंगळे,सुग्रीव रसाळ,अच्युत मोरे,माधवराव मोराळे, सर्जेराव खटाने,अर्जुन बहिरवाळ,सखाराम मस्के,फईम सर,उषाताई विजय सरवदे,मुखीद लाला, दिनेश लाला पवार,पांडुरंग भूमकर,मुन्ना फुटाणे ,राजाभाऊ शेळके,दिलीप आहेर,अच्युत शेळके,बालप्रसाद जाजू,देविदास चरखा,संदीप डावकर, नवनाथ घोडके,संपत नाना गुंदेकर,महारुद्र वाघ, राजेंद्र काळे,आदी मान्यवर उपस्थित होते

 

चौकट

 

टायगर अभि जिंदा है-विधाते

 

एकनिष्ठता काय असते ती बीडच्या नगरसेवक विलास विधाते यांनी दाखवून दिले आज सूत गिरणी येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेच्या वेळी त्यांनी घनाघाती भाषण केले, नेत्याच्या पाठीशी एकनिष्ठ कार्यकर्ता असेल तर तो नेता खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहू शकतो,जयदत्त आण्णा हे असे नेतृत्व आहे की त्यांनी 40 वर्षात 20 वर्ष मंत्रिपद तर 20 वर्ष आमदार म्हणून काम केले, आजची उपस्थिती त्याची साक्ष आहे कारण आपल्यासाठी जयदत्त अण्णा हाच एक पक्ष आहे सत्तेबरोबर कुणी गेले म्हणून ओरडून जाण्याचे कारण नाही त्यांचा निर्णय हा परिवाराचा निर्णय आहे अण्णांनी अनेक चढउतार पाहिले आहेत सत्ता कशी उपयोगी पडते हे अण्णांनी दाखवून दिले आहे असे सक्षम नेतृत्व सोडून आपण सत्तेचा उन्नत जवळ करायचा का?असा सवाल करत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या