*या देशात मुलाच्या शिक्षणाची फी त्याच्या आईच्या बलिदानाने चुकवावी लागते. हेच या देशाचं वास्तव.!!*
___________________________
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या देशाने साजरा केला. परंतु त्याच देशात मुलाच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी त्या फीची रक्कम त्या मुलाच्या आईला आपला जीव देऊन चुकवावी लागते.
या देशातील भांडवलदार, उद्योजक करोडोंचे कर्ज घेतात आणि या देशाला चुना लावून परदेशात पळून जातात. आणि असल्या भामट्यांना आमच्या देशात कर्ज मिळतं पण शिक्षणासाठी इथ गरिबांना कर्ज दिल जात नाही.
अन् यावेळी डॉ.अण्णाभाऊ साठेंच एक वाक्य आठवत “ये आजादी झुटी है, देश की जनता भूकी की है।”
त्या माय माऊलीच्या त्यागाला सलाम आहे. एवढी टोकाची भूमिका त्यांनी घ्यायला नको होती. पण त्यांच्या या कृतीन पुन्हा एकदा या देशाचं भोंगळ वास्तव जगासमोर आल.
आतातरी या देशातील बहुजन शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांनी जाग व्हावं एवढीच अपेक्षा..!!
*लेखक/कवी~सुरज साठे*
*लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे*
*जन्मभूमी वाटेगाव*
9370626619