बीड, प्रतिनिधी– विधानसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असून मराठा समाजाच्या मतांचं विभाजन करण्यासाठी मराठा विरोधक असलेल्या क्षीरसागरांचे काही हस्तक जाणीवपूर्वक वंदनीय मनोजदादा जरांगे पाटलांचे माझा कुणाला पाठिंबा नाही अशा वक्तव्याचा विडिओ सोशल मीडियावर वायरल करत आहेत व त्यानुसारच्या पेड बातम्या वर्तमानपत्रात छापून आणत आहेत. मात्र मराठा समाजाला माझा प्रश्न आहे की, लोकसभेला मा. जरांगे पाटलांनी जाहीररित्या कुणाला सांगितले होते का कोणाला निवडणून आणायचे? तरी मराठा समाजाने कुणाला पाडायचे आणि निवडून आणायचे ते आणलं. काही कारणास्तव मनोजदादांना जाहीर भूमिका घेता येत नसल्या किंवा त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला जाहीर पाठिंबा दर्शवला नसला तरी ते आपला गणीमी कावा पूर्ण काम करत आहेत आणि तो संदेश गावागावात पोहचत आहे. आम्ही सगळे मराठा समाजाचे हित पाहणारे जातीला काही नुकसान होणार नाही असेच काम करत आहोत. मराठा जातीच्या मुलांचे स्वप्न भंग होऊ देयचे नाहीत व मराठा समाजाचे उज्वल भविष्य आम्हाला हवे आहे म्हणून आम्ही बीड विधानसभेचे अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना विजयी करण्यासाठी त्यांचा प्रचार करत आहोत. मनोजदादा म्हणाले की, जो जातीसाठी काम करतो, समाजासाठी योगदान देतो त्याला निवडून आणा. अनिलदादा जगताप यांनी कायम मराठा समाजासाठी सार्थ हित सोडून आपले योगदान दिले आहे यामुळे मराठा मतदारांनो, या विधानसभा निवडणुकीत सर्व मराठा मतदारांनी एकजूट होऊन येत्या 20 नोव्हेंबर रोजी बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिलदादा जागताप यांनाच आपले अमूल्य मत अनुक्रमांक 13 वरील शिलाई मशीन या निशाणी समोरील बटण दाबून बहुमताने विजयी करूयात व आपला गुलाल थेट अंतरवलीला पाठवूयात. असे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक मराठा सेवक ॲड. स्वप्निल भैय्या गलधर यांनी म्हंटले आहे.