14 C
New York
Wednesday, March 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

स्वनिल गलधर शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदी नियुक्त…

 

बीड (प्रतिनिधी) भाजपचे एकेकाळचे सक्रिय नेते तथा मराठा आंदोलक म्हणून गेल्या काही महिन्यात सुपरीचित झालेल्या स्वप्निल गलधर यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली असून आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावेळी शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे बाजीराव चव्हाण हे उपस्थित होते.स्वप्निल गलधर हे एकेकाळी भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू सहकारी होते तर लिंबागणेश या मोठ्या गावच्या सरपंचपदाची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे .गेल्या काही दिवसापासून त्यांनी भाजपा चे काम थांबवून पूर्ण वेळ मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यासोबत सक्रियपणे कार्य केले कार्य करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र मनोज जरांगे यांच्या आदेशानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला होता .आता ते शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कसे कार्य करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या निवडीचे बीड शहर आणि जिल्ह्यात स्वागत करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या