◼️काकांच्या प्रचारार्थ पुतण्या शिवराज पवार मैदानात; परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम
◼️आ.लक्ष्मण पवारांच्या प्रचारार्थ संपर्क कार्यालयात नियोजन बैठक संपन्न
गेवराई महाराष्ट्र आरंभ वृत्त : मतदारसंघातील संघातील जनतेने आमदार लक्ष्मण अण्णांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत दहा वर्ष सेवा करण्याची संधी दिली त्या संधीचे आण्णांनी सोन करून मतदारसंघात गाव तिथे रस्ता करत दळणवळण सुकर केले तसेच अनेक गावांत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मतदारसंघात अनेक बंधारे बांधून जलसिंचन करण्याचे काम केले आहे. तर गोरगरीब लोकांना आपल्या हाक्काचे राशन मिळावे म्हणून प्रशासकीयस्तरावर सातत्याने प्रयत्न करत राशन वितरण व्यवस्था सुरळीत करून आज मतदारसंघातील प्रत्येक कार्ड धारकांना हाक्काचे राशन मिळत आहे त्यामुळे जनतेने पुन्हा आग्रह करत आ.लक्ष्मण आण्णांना विधानसभा निवडणुकीत उभा केले आहे तरी आण्णांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यक्रत्यांनी कामाला लागावे असे आव्हान शिवराज पवार यांनी बैठकी दरम्यान बोलतांना केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आ.लक्ष्मण पवार यांच्या प्रचारासाठी तसेच निवडणूक जिंकण्यासाठी आ.लक्ष्मण पवार यांच्या संपर्क कार्यालयात युवानेते शिवराज पवार यांच्या उपस्थितीत आज 26 रोजी सकाळी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आ.लक्ष्मण पवार यांनी मतदारसंघात दहा वर्षांत केलेले काम जनतेत पर्यंत गेले पाहिजे यासाठी प्रत्येकांनी गावागावात चर्चा करून भविष्यातील उर्वरित विकास काम करण्यासाठी आ.लक्ष्मण पवार यांच्या विजयासाठी कार्यक्रत्यांनी कामाला लागावे असे आव्हान शिवराज पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकी दरम्यान केले आहे
यावेळी दादासाहेब गिरी,मधुकर वादे,ब्रम्हदेव धुरंधरे, संजय इगळे,कानगुडे आप्पासाहेब, धम्मपाल सौदरमल, भरत गायकवाड, विठ्ठल मोटे,मुन्ना शेठ, जुनेद बागवान, अनिल आप्पा शेट्टे, रशीद बागवान, सचिन वावरे,बद्दोदिन, पिटु साळवे, लक्ष्मण खरात, आदी उपस्थित होते. मतदारसंघात गेली काही दिवसा पासुन आ.लक्ष्मण पवार यांनी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली त्यानंतर मतदार संघातील जनते मोठ्या प्रमाणात चल बीचल निर्माण झाली तर अनेक कार्यक्रते पदाधिकारी यांनी उपोषणांचा निर्णय घेतला होता
त्यामुळे आ.लक्ष्मण पवार यांनी बैठक घेऊन सर्वाशी संवाद साधत आपली भुमीका व्यक्त केली होती त्यावर सर्वांनीच आण्णा तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली सर्वाच्या मताने आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुक लढणार असल्यांचे जाहीर केला त्यामुळे मतदारसंघातील जनतेसह कार्यक्रत्यांनी निर्णयांचे स्वागत केले आहे