3.4 C
New York
Thursday, February 19, 2026

Buy now

spot_img
spot_img

सिरसदेवीत दुदैवी घटना सात वर्षीय मुलीचा साप चावल्याने मृत्यू

सिरसदेवी, महाराष्ट्र आरंभ वृत्त : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील अडागळे वस्तीवर राहणाऱ्या नितीन थोरात यांच्या 7वर्षीय मुलीची साप चावल्याने मृत्यू झाला आहे. या मुलीचे नाव रागिणी नितीन थोरात वय (07) असून ही घटना रात्री 12 ते 1च्या दरम्यान घडली आहे. मुलगी आणि तिचे वडील रात्री घराच्या बाहेर झोपलेले असताना मुलीला झोपेतच तिच्या हाताच्या दंडावर साप चावल्याने मुलगी उठली व तिला चक्कर आली, उलट्या होऊ लागल्या तसेच तिच्या थोंडातून फेस येऊ लागल्याने तिला तात्काळ बीड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले परंतु उपचारा पूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या दुर्दैवी घटनेमुळे अडागळे वस्तीवर हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या