22.8 C
New York
Monday, April 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

वीज पंप चालू करत असताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू!

◼️गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथील घटना

गेवराई, महाराष्ट्र आरंभ वृत्त : शेतातील विहिरीवरील वीज पंप चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भेंडटाकळी तांडा येथे आज दि.४ ऑक्टोबर रोजी घडली आहे. गोरख कनीराम राठोड (वय ४५ रा. भेंडटाकळी तांडा, ता. गेवराई) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गोरख राठोड हे शेतातील विहिरीवरील विज पंप चालू करण्यासाठी गेले होते. आणि ते चालू करत असताना स्टार्टरचे वायर हातात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके हे घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तांड्यावर शोकाकुल झाला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या