बीड, महाराष्ट्र आरंभ : साहित्यसम्राट,अण्णा भाऊ साठे यांची जयंती देशभरात मोठ्या उस्ताहात साजरी होते. त्या अनुषंगाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०४ व्या जयंती निमीत्त बीड शहरात भव्य रक्तदान व अरोग्य शिबिराचे आयोजन अथर्व मस्के युवक फाऊंडेशन च्या वतीने केले आहे.
रक्त-दान हे जात पात पाहून केलं जात नाही रक्त दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. १ ऑगस्ट रोजी स.१० ते ३ वाजेपर्यंत रक्तदान व आरोग्य शिबीर शांती नगर येथे आयोजित केले आहे. रक्तदान म्हणजे जीवनरक्षक ते आपण व्हा, सर्व मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन युवा नेते अथर्व मस्के यांनी केले आहे.