30.4 C
New York
Thursday, July 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

लबाड ओबीसी नेत्यांनी समाजात संभ्रम निर्माण करू नये- राजेद्र मस्के

लबाड ओबीसी नेत्यांनी समाजात संभ्रम निर्माण करू नये – राजेंद्र मस्के

वांगी येथील महादेव शेळके यांच्या उपोषणाला राजेंद्र मस्केंचा पाठींबा ..!

( बीड प्रतिनिधी )

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणामुळे आरक्षणाचा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला. राज्य सरकार निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलत असताना काही लबाड ओबीसी नेते जाणीवपूर्वक कृती आणि वक्तव्यातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरगरीब सामान्य मराठा, ओबीसी व इतर समाज गुण्यागोविंदाने नांदतो आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढत असताना काही लोक कुटील डाव टाकत आहेत. या मुळे समाजात दुफळी होईल याचे भान ठेवावे. कोणताही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी वांगी येथे केले आहे.

बीड तालुक्यातील वांगी येथिल मराठा युवक महादेव शेळके यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भेट घेऊन, उपोषणाचे समर्थन केले.

यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरे, मार्केट कमिटी माजी सभापती अरुण नाना डाके, माजी सभापती सोमनाथराव माने, बालाजी पवार, शांतीनाथ डोरले, नितीन आमटे यांच्यासह समाज बहुसंखेने उपस्थित होता.

राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाला सामान्य ओबीसी, मुस्लीम, दलित बांधवांचा पाठींबा आहे. समाजाला राजकीय आरक्षणाचे गरज नाही हे जग जाहीर आहे. काही लबाड लोक स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी जाणीपूर्वक खोडा घालून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

मराठा शिक्षण व नोकरी क्षेत्रात मागे पडला. आरक्षणावर मराठ्यांचा हक्क असून ती त्याजी गरज आहे. विनाकारण समाजाला न खिजवता आरक्षणाच्या या लढ्यात सर्वांनी सकारात्मक भूमिका घेऊन आरक्षणाला मदत केली पाहिजे. अशी इच्छा राजेंद्र मस्के यांनी प्रगट केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या