12.5 C
New York
Wednesday, April 22, 2026

Buy now

spot_img
spot_img

जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण पोलिस लाठिचार्ज

बीड (प्रतिनिधी ) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या आमरण उपोषणाला अंतरवाली (सराटी)मराठा आंदोलकांवर पोलिस प्रशासनाने सौम्य लाठीचार्ज केला. तसेच पोलिसांनी लाठीचार्ज करून हवेत गोळीबार करण्यात आला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.तर आंदोलकांना पागंवण्यासाठी पोलिसांकडून नळकांड्या फोडण्यात आल्या. यावेळी पोलिस आणि आंदोलक आमने-सामने आले. त्यांच्यात झटापट झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम असून आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही , अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचं दिसताच त्यानंतर मोठ्या प्रमाणात तेथे दगडफेक करण्यात आली. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या