10.5 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे -विवेक कुचेकर

आदरणीय शरद पवार साहेबांच्या स्वाभिमान सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा — विवेक कुचेकर

 

 

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस मधील मोठा गट शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब हे महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी सभा घेत आहेत. बीड शहरामध्ये गुरुवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी शरद पवार साहेबांची स्वाभिमान सभा होत आहे

देशात व राज्यात जाती जातींमध्ये धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे . देशात अराजकता माजवण्याचे काम सरकार करत असुन फोडा फोडीच्या राजकारणामुळे राज्यातील सामान्य नागरिक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.

विचारधारा सोडुन जातीयवादी शक्तींना पाठबळ देणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांची स्वाभिमान सभा बीड याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे पुरोगामीत्व जिवंत ठेवण्यासाठी व शरदचंद्रजी पवार साहेब

यांचे हात बळकट करण्यासाठी स्वाभिमान सभेला शेतकरी , कष्टकरी, कामगार, ओबीसी,दलीत , आदिवासी ,भटके विमुक्त, बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते विवेक कुचेकर यांनी केले आहे.

 

बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गाव ,वाडी, वस्ती, तांड्यावर आदरणीय साहेबांच्या स्वाभिमानी सभे बाबत उत्साह आहे. युवक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक असे सर्वच आदरणीय साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राचे नेतृत्व फक्त शरद पवार साहेबांनीच करावे अशी भावना जनमानसाची आहे . या ऐतिहासिक सभेमध्ये शरद पवार साहेब काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडमध्ये होत असलेल्या स्वाभिमान सभेसाठी जिल्ह्यातील नागरिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा नेते विवेक कुचेकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या