20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

लोखडी सावरगाव आरोग्य कर्मचारी अवैध भरती अखेर रद्द करण्यात आली आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी स्थिगित केली.

बीड- आर्थिक वादाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य भरती प्रक्रियेवरून निलंबित तथा वादग्रस्त बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांचे निलंबन झाले ती भरती प्रक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्थगित केली आहे.त्यामुळे पैसे देणाऱ्यांनी आता एजंट दलाल काही आरोग्य अधिकारी कर्मचारी पुढाऱ्यांच्या घरी चकरा मारणे सुरू केले असल्याचे समजते.

बीडच्या लोखंडी सावरगाव या ठिकाणच्या रुग्णालयात आरोग्य भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या भरतीचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलं होतं, त्या कंपनीने यामध्ये गैरव्यवहार केल्याचे अनेक आरोप झाले होते. त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी त्या प्रणालीतील दोष समितीचा अहवाल सादर होणे आवश्यक असतं. मात्र, या पदभरती संदर्भात आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी लातूरचे आरोग्य परिमंडळ अधिकाऱ्यांनी समिती नेमली असून, या समितीच्या अहवाला पूर्वीच डॉ सुरेश साबळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर आता या आरोग्य भरतीला स्थगिती देण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात सुरु असलेल्या नोकरभरतीमध्ये मोठ्याप्रमाणावर पैसे उकळले जात असल्याच्या चर्चा होत्या.यांसंदर्भात विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करुन जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे. तसेच, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लातूरचे आरोग्य परिमंडळ अधिकाऱ्यांनी समिती नेमण्यात देखील आली होती. मात्र, आता थेट  ही अवैध पणे झालेली भरतीच रद्द करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, अधिकारी,  गुंतले असल्याची चर्चा होती.आता ज्यांनी ज्यांनी पैसे देऊन नोकरी मिळवली आहे त्यांनी आरोग्य अधिकारी कर्मचारी वपुढाऱ्यांच्या घरी चकरा मारायला सुरुवात केली . यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या