20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

चौसाळा येथील गावठाण हद्द व बाहेरील विस्तार वाढ झालेल्या घरांची नोंद सिटीसर्वेत करा- विवेक कुचेकर

चौसाळा येथील गावठाण हद्दीमध्ये व बाहेरील विस्तार वाढ झालेल्या घरांची नोंद सिटीसर्वे मध्ये करण्यात यावी–विवेक कुचेकर

(बीड प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथील गावठाणा मध्ये TV असणाऱ्या जागेची नोंद ही सिटीसर्वे मध्ये नसल्यामुळे अनेक लोकांचे शासकीय कामे खोळंबले असून त्यांना राहत्या जागेवर गृह कर्ज, तारण कर्ज करायचे म्हटले तर होत नाही त्यासाठी त्यांना सिटी सर्वे पी आर कार्ड ची आवश्यकता आहे .मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढायचे म्हटले तर सर्वसामान्य जनतेला आपल्या राहत्या घरावर कर्ज घ्यावे लागते .पण पीआर कार्ड नसल्यामुळे त्यांना कर्ज भेटत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे शैक्षणिक आर्थिक व मानसिक नुकसान होते. गेल्या ३५ ते ४० वर्षापासून चौसाळा शहरांमध्ये वास्तव्य करत असणाऱ्या घरांची नोंद ही झालेली नाही. काही लोक खाजगी टेंडर घेऊन नुसत्या घरांचे मोजमाप करून शंभर, दोनशे रुपये च्या पावत्या फाडून जातात. लोकांनी विचारले असता त्यांना ते सर्वे आहे असे सांगतात. प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा काहीही फायदा होत नाही. इथून मागे असेच झाले आहे. त्यामुळे महसूल कार्यालयाने तसेच भूमी अभिलेख कार्यालयाने योग्य ती कार्यवाही करून गावातील लोकांना न्याय द्यावा ,कारण खूप लोक हे या सिटीसर्वेमुळे अडचणीत आहेत .त्यांची शासकीय कामे कर्ज प्रकरणे सिटीसर्वे नसल्यामुळे होत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर सिटीसर्वे हा करण्यात यावा व लोकांची राहत्या घराची नोंद सिटी सर्वे मध्ये घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते विवेक कुचेकर यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या