28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन राज्यातील दोन लाख 22 हजार 135 गरीब अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावण्यात आले आहेत या निर्णयामुळे राज्यातील लोक दहशतीत आहेत अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांचे छत हिसकावून त्यांना बेघर करण्याचा हा डाव असून या विरोधात वंचित बहुजन आघाडी तर्फे ऍड: प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता,राणीबाग भायखळा, मुंबई मध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे. नियमानुसार 20 ते 30 वर्षापासून वास्तव्याला असणाऱ्याचे अतिक्रमण नियमानुकुल केले जाते अनेक शासन निर्णय व न्यायालयाचे आदेश याबाबत आहेत मात्र न्यायालयाचा आधार घेऊन नागरिकांच्या डोक्यावरील छत काढले जात आहे. तरी बीड जिल्ह्यातील सर्व गायरान धारकांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन विशाल वंजारे, बुद्धभूषण वंजारे, समाधान पवळे यांनी केले .

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या