25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

अंगणवाडी मदतनीस पदाच्या जागेमध्ये पारदर्शकता ठेवा- वंचित बहुजन आघाडी आर्थिक तडजोडी संदर्भात जिल्हाधिकारी व ए.सी.बीकडेतक्रार

अंगणवाडी मदतनीस पदाच्या जागेमध्ये पारदर्शकता ठेवा-वंचित बहुजन आघाडी

आर्थिक तडजोडी संदर्भात जिल्हाधिकारी व ए.सी.बी बीडकडे तक्रार

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाच्या खूप मोठ्या प्रमाणात जागा निघाल्या आहेत. अंगणवाडी मदतनीस पदाची निवड करण्यासाठी गुणवत्तेच्या आधारे थेट नियुक्ती आदेश देण्याचे नमूद आहे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी गोरगरीब सुशिक्षित बेकार व उच्च शिक्षण घेणाऱ्याना महिलांना सेवेत समाविष्ट करण्यासाठी सेटिंग लावत त्यांच्या नातेवाईकाला 50 हजार ते 1 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याची माहिती काही उमेदवारांनी नाव न सांगण्याचा अटीवर सांगितली आहे. सदरील आर्थिक मागणी मुख्य सेविका, लिपिक, शिपाई यांच्या मार्फत सुरू आहे. तसेच काही ठिकाणी शेतात आणि घरी जावून बाल विकास प्रकल्प अधिकारी स्वतः पैसे घेऊन येत आहेत.

राजकीय, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांनी प्रत्येक बाल विकास प्रकल्प कार्यालय यांच्यावर बारकाईने लक्ष द्यावे. गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घ्यावी व गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार महिलांची पैशासाठी अडवणूक होऊ नये यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करावेत. याकरिता खंडू नाना जाधव युवा नेते अजय सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष उमेश तूळवे, तालुकाध्यक्ष किरण वाघमारे, शहराध्यक्ष लखन जोगदंड, मिलिंद सरपते, सुमित उजगरे, अमर ससाने, मल्हारी जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या