27.5 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

१ ऑगस्ट २०२३ रोजी साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमीत महाराष्ट्रातील लहुसैनिक लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी येणार – बाळुभाऊ लोंढे अध्यक्ष मातंग युवा जोडो अभियान समिती महाराष्ट्र

जय लहुजी बोलो..चलो वाटेगाव..
महाराष्ट्रातील लहुसैनिकांनो १ ऑगस्ट २०२३ रोजी आपणं सर्वांनी सांगली जिल्हा वाटेगाव येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहुन साहित्यरत्न, विश्वरत्न, लोकशाहिर
डॉ.अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत आपणही लाखात आपली उपस्थिती दाखवावी,

आपणं तर दरवर्षी आप-आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात व गावात जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी करतो पण यावर्षी आपल्याला आपली उर्जाभुमी व साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव याठिकाणी लाखों समाज बांधवांच्या साक्षीने आपल्या बापाला अभिवादन करण्यासाठी यायचं आहे,

यावर्षी वाटेगाव येथे लहुसैनिक लाखोंच्या संख्येने आलोट गर्दी करुन अभिवादन करण्यासाठी येणार आहेत, आपल्या बापाची जन्मभूमी संबंध भारत देशाला दाखवुन द्यायची आहे, म्हणुन आपणही या आलोट गर्दीचे साक्षीदार व्हावे, हिच आपणांस मी बाळुभाऊ लोंढे अध्यक्ष मातंग युवा जोडो अभियान समिती महाराष्ट्र या नात्याने विनंती करत आहे. 🙏

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या