14 C
New York
Wednesday, March 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

सोने झळाळले तर चांदीही चकाकली; पाहा १० ग्रॅमची किती आहे किंमत?

वी दिल्ली : दर आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. दोन आठवड्यापूर्वी कमी झालेला सोन्याचा भाव या आठवड्यात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सोने खरेदीदारांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे.

 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,४७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,४७० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७५,९७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,९७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,५१४ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,४७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५१४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५१४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५१४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४७० रुपये आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या