25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

अजित पवार मंत्र्यांसह शरद पवार यांच्या भेटीला; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.

मुंबई :

अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर यशवंतराव चव्हाण सेंटरला जात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राज्यात सध्या भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचं सरकार सत्तेत आहे.

त्यामुळे या भेटीवर युतीतील सहकाऱ्यांची प्रतिक्रियाही महत्वाची आहे. शिवसेनेचे नेते, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत म्हणाले…

अजितदादा पवार सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास अजितदादांना चांगला वाटतोयय शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे गतिमान काम करत आहेत. त्यांच्यासोबत अजितदादा आलेले आहेत, असं ते म्हणाले

अजित पवारांनी शरद पवारसाहेबांची भेट का घेतली हे त्यांनाच विचारावं लागेल. त्यांनाच ते येत्या काळात जाहीर करावं लागेल. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असू शकतो. पण शिंदेसाहेब, फडणवीसजी आणि अजितदादा हे तिघे सध्या एकत्र आलेले आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार वेगाने काम करेन यात शंका नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचं सरकार सध्या सत्तेत आहे. अशात अजित पवार यांनी अचानकपणे शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दोन जुलैला अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. मात्र त्यानंतर आज सर्व मंत्र्यांसह अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या