बीड, महाराष्ट्र आरंभ वृत : बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी जिल्ह्याची धुरा सांभाळल्या पासून शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्ह्यातील गुंडागिरीचे व गुन्हेगारीचे तसेच अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडांवर कारवाई करण्याचे योजिले आहे. त्या अनुषंगाने चकलांबा सपोनी यांनी दि.०३-०९-२०२४ रोजी इसम नामे अक्षय विठ्ठल ढाकणे (वय ३०) वर्ष रा. मुंगी ता. शेवगाव जि. अहमदनगर यांच्याविरुद्ध एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. सदर स्थानबद्ध इस्माविरुद्ध अहमदनगर व बीड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जाळपोळ करणे, गौण खनिज वाळू चोरी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे, मारहाण करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, अशा गंभीर स्वरूपाची एकूण १० गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदरील इसम हे शरीराविरुद्धचे व मालाविरूद्धचे गंभीर गुन्हे करून गोदावरी नदी पात्रातील वाळू गौण खनिज याची चोरी करून साठा करून बड्या भावाने विक्री करत असल्याने पोलिसांची त्यांच्यावर बऱ्याच दिवसापासून करडी नजर होती. तसेच सदर इसमाने आपले वर्तन सुधरावे म्हणून यापूर्वी crpc ११० प्रमाणे दोन वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम प्रतिबंधक कारवाईत न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने वाळू गौण खनिज चोरीचे गुन्हे करण्याचे चालूच ठेवून होता. त्याची तलवाडा, चकलांबा, गेवराई व नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी तालुक्यात दहशत आहे. त्याच्या विरुद्ध सर्वसामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत. तो सर्वसामान्य लोकांना व शेतकऱ्यांना त्रास देऊन दहशत निर्माण करून वाळू चोरीचे गुन्हे करत होता.
सदर प्रकरणात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दि.१९-०९-२०२४ रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए कायद्याअंतर्गत आदेश पारित करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेऊन हर्सूल कारागृह व छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबद्ध करणे याबाबत आदेश पारित केले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी सदर इसमाज तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना दिले होते. तेव्हापासून चकलांबा पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नमुद इसमाचा शोध घेत होते. तो फरार झालेला असल्याने मिळून येत नव्हता व अटक टाळण्यासाठी स्वतःचे अस्तित्व लपून वावरत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी गोपनीय बातमीच्या आधारे नमूद प्रस्तावित स्थानबद्ध दि.२९-०१-२०२५ रोजी बालमटाकळी ता. शेवगाव परिसरातून सायंकाळी ६.३० वाजता अभ्यास घेतली असून चकलांबा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. चकलांबा पोलीस स्टेशन येथे सदर इसमास कायदेशीररित्या ताब्यात घेऊन योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत अपोअ सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यासह सपोउपनि अभिमन्यू औताडे, संजय जायभाये, पोना गणेश हंगे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेली आहे.