10.7 C
New York
Wednesday, November 20, 2024

Buy now

spot_img
spot_img

उच्चशिक्षित सालकरी ठेवण्यासाठी योगेशला मतदानातून आशीर्वाद द्या. – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड, महाराष्ट्र आरंभ वृत्त : “स्वर्गीय काकूंच्या वारशाचा आदर राखत, जनतेची सेवा करणारा, उच्चशिक्षित आणि समजदार आमदार विधानसभेत पाठवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे मतदान करून योगेश क्षीरसागर यांना आशीर्वाद द्या,” असे आवाहनमाजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी चौसाळा येथे झालेल्या संवाद मेळाव्यात केले याप्रसंगी व्यासपीठावरकार्यक्रमाच्या व्यासपीठावर बाबू शेठ लोढा, नितीन शेठ लोढा, माधवराव मोराळे, अॅड. डोईफोडे, तांगडे साहेब, यांची प्रमुख उपस्थिती होती.

  • जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की, सत्ता ही विकासाचे माध्यम असून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्तेत आपला माणूस असणे गरजेचे आहे. “दीर्घकालीन विकास, जनतेच्या अडीअडचणी सोडवणे आणि गावागावांमध्ये विकासाची गंगा पोहोचवणे ही आपली प्राथमिकता राहील. जातीपातीचे दाखले देऊन भावनिक बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना थारा देऊ नका,” असे ते म्हणाले.

प्रलोभनांना दूर ठेवण्याचा सल्ला

“आम्ही सत्ता वाळूचे ठेके किंवा गुटखा क्लब चालवण्यासाठी मागत नाही. आम्हाला सत्तेत येऊन विकासकामे करायची आहेत. त्यामुळे तुमचे मत वाया घालवू नका,” असे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले.

मान्यवरांची उपस्थिती

रामजी बाप्पा शिंदे, शिकुर शेठ, श्रीमंत सोनवणे, काकासाहेब जोगदंड, उपसरपंच अंकुशराव कळसे, सतीश भाऊ जोगदंड, लोणीचे माजी सरपंच बाबुराव मिटकरी यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

उत्स्फूर्त प्रतिसाद

या संवाद मेळाव्याला चौसाळा आणि पंचक्रोशीतील मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरखेड गावच्या सरपंचांनी गावकऱ्यांमार्फत माजी मंत्र्यांचा सत्कार केला.”जनतेचा आशीर्वाद हीच आमची खरी कमाई आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांना मतदान करा,” असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या