शिवाजी भाऊ सुतार मित्रमंडळाचा अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांना पाठिंबा..
माजी नगरसेवक शिवाजी भाऊ सुतार यांच्या पाठिंब्याने रमेश आडसकर यांचे पारडे जड..
माजलगांव, सुनिल थोरात
शिवाजी भाऊ सुतार मित्र मंडळाच्या वतीने काल माजलगाव येथे रॅली व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये शिवाजी भाऊ सुतार मित्र मंडळाच्या वतीने अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यामुळे रमेश आडसकर यांचे पारडं अजून जड झालेले आहे आणि रमेश आडसकर यांच्या विजयामध्ये अजून भर पडलेली आहे. माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या सर्व उमेदवारांच्या वतीने जोरदार प्रचार चालू आहे. यातच अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांच्याकडे जोरदार इनकमिंग चालू आहे आणि यामुळे रमेश आडसकर यांची बाजू भक्कम होत असून याचा धसका महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेला आहे. रमेश आडसकरांनी त्यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल शिवाजीभाऊ सुतार मित्र मंडळाचे आभार व्यक्त करून त्यांना भविष्यात योग्य संधी देणार असल्याचे एक सुतोवाच केले या प्रसंगी
त्यांनी माजलगाव मतदारसंघातील दुरावस्थे बाबत प्रकाश सोळंके यांना जबाबदार ठरवून त्यांना आता सक्तीच्या विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगीतले.
सोळंकेच्या दुर्लक्षामुळे माजलगाव शहर धारूर तालुका व वडवणी तालुक्यातील अनेक गावांची वाताहत झाली आहे. रस्त्यांची दुरावस्था झाली असुन मला संधी दिल्यास जनतेसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहे. तसेच त्यांच्याविषयी अफवा पसरवली जात आहे की ते निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील पण रमेश आडसकर यांनी ठणकावून सांगितले की पुढील पाच वर्षे मी कुठे जाणार नाही याच मतदारसंघात अपक्ष म्हणूनच काम करणार व जनतेची सेवा करणार हे स्पष्ट केले. पुढील पाच वर्ष मी जनतेचा सालगडी म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुंबई उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मनोहर डाके, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष हरिभाऊ सोळंके, बाजार समितीचे माजी संचालक निळकंठ भोसले, बंडू लोखंडे,विलास खंडागळे यांच्यासह पत्रकार बांधव व शिवाजी भाऊ सुतार मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.