22.8 C
New York
Monday, April 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीडची जागा शिवसेनेचीच, मुख्यमंत्री शिंदे साहेब बाळासाहेबांच्या एकनिष्ठ शिवसैनिकावर अन्याय करणार नाहीत- सुनिल अनभुले

 

बीड, प्रतिनिधी– शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून बीडची ओळख सर्वश्रुत आहे. एकदा नव्हे तब्बल तीन वेळा शिवसेनेचा आमदार बीडकरांनी निवडणुन दिला आहे. वर्षानुवर्षे बीड मतदार संघाची जागा शिवसेनेला सुटत आली आहे आणि ती यावेळेसही शिवसेनेलाच सुटणार आहे. तीन दशकांपेक्षा अधिक काळ मा. अनिलदादा जगताप हे बाळासाहेबांच्या विचारधारनेला प्रेरित होऊन संपूर्ण जिल्ह्याभरात शिवसेना पक्ष बांधणी करत आले आहेत.

बीडला शिवसेनेचा बालेकिल्ला बनविण्यात अनिलदादांचे योगदान मोलाचे आहे आणि हे बीडकर देखील चांगलेच जाणून आहेत. आजवर शिवसेना आणि बाळासाहेब यांच्या विचार व धोरनावर ठाम राहणाऱ्या अनिलदादा जगताप यांच्या कार्याचे आणि योगदानाची सर्वोपरी माहिती तळागाळातील माणसांची जाण असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे साहेब हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असणाऱ्या मा. अनिलदादा जगताप यांच्यावर अन्याय होऊ न देता अनिलदादांना न्याय देणार असा आम्हा शिवसैनिकांना पूर्णतः विश्वास असल्याचे बीड विधानसभा प्रमुख सुनिल अनभुले यांनी माध्यमांना पत्रक प्रसिद्ध करून आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार आहे व त्यासाठी कामाला लागा असे सांगितले देखील आहे आणि आम्ही देखील सर्व शिवसैनिक अनिलदादा जगताप यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी कामाला लागलो आहोत. अनिलदादा जगताप यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय पक्का आहे व ते विक्रमी मतांनी निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही असे बीड विधानसभा प्रमुख सुनिल अनभुले यांनी पत्रकात म्हंटले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या