2.9 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची पहिली यादी तयार! असे आहेत संभाव्य ३९ उमेदवार

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता अन्य पक्षांची यादी कधी जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी अद्याप भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उद्या २२ ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात होईल. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष आणि महायुतीतील पक्ष देखील उद्या किमान पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. अशात महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संभाव्य यादी समोर आली आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत जागा वाटपावरून शिवसेनेचे टोकाचे मतभेद असल्याचे समोर आले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत ११ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. या यादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इस्लामपूर, जितेंद्र आव्हाड यांना कळवा मुंब्रा, अनिल देशमुख यांना काटोल, राजेश टोपे यांना घनसावंगी, बाळासाहेब पाटील यांना उत्तर कराड, रोहित पवार यांना कर्जत जामखेड, राहुरीमधून प्राजक्ता तनपुरे, तासगाव कवठे महाकाळ येथून रोहित पाटील, विक्रमगड येथून सुनील भुसारा, शिरूरमधून अशोक पवार, शिराळा येथून मानसिंग नाईक कोरेगाव येथून शशिकांत शिंदे, बीडमधून ज्योती मेटे किंवा संदीप क्षीरसागर, इंदारपूरमधून हर्षवर्धन पाटील, घाटकोपर पूर्व येथून राखीताई जाधव, सिंदखेड राजा येथून राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळू शकते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या